पणजी -कोरोनामुळे अनेक नागरिकांना फटका बसला असून अनेकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली आहे. यातच अनेक पालकांसमोर मुलांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न भेडसावत आहे. यातून राज्य सरकारने पालकांना दिलासा देत चालू वर्षातील महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात ट्युशन फी, जिमखाना शुल्क यात सरकारने विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत दिली आहे.
40 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा -
राज्यातील शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या 36 महाविद्यालयातील 40 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील बीएस्सी, बीकॉम आणि बीए शाखेतील विद्यार्थी या शैक्षणिक शुल्क सुविधेसाठी पात्र ठरणार आहेत.
शिक्षकांच्या दुसऱ्या डोससाठी केंद्राकडून मार्गदर्शन -