महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा : ऑक्सिजनअभावी २६ जणांचा मृत्यू ? उच्च न्यायालयाने चौकशी करण्याची सरकारची मागणी - Goa Medical College and Hospital

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएमसीएचला भेट दिली आहे. कोरोना वॉर्डमध्ये रात्री ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे काही रुग्णांना गंभीर समस्या उद्भवली असण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

By

Published : May 11, 2021, 4:47 PM IST

गोवा -सरकारी रुग्णालय गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील (जीएमसीएच) २६ कोरोनाबाधितांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी रात्री २ ते सकाळी सहा वाजेदरम्यान घडली आहे. या घटनेचा तपास करण्यात येणार असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएमसीएचला भेट दिली आहे. कोरोना वॉर्डमध्ये रात्री ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे काही रुग्णांना गंभीर समस्या उद्भवली असण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचीही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. सोमवारी रात्री जीएमसीएच रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता, हे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना मान्य केले.

हेही वाचा-अमेरिकेचे एक पाऊल पुढे! फायझरची लस १२ ते १५ वयोगटातील मुलांनाही मिळणार

जीएमसीएचमध्ये रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याबाबतचे कारण समोर आले नसल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. रुग्णांच्या मृत्यूमागील कारण उच्च न्यायालयाने शोधावे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत जीएमसीएच रुग्णालयाला करण्यात आलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी. त्यामुळे योग्य गोष्टी होतील, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दिलासादायक! राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट

जीएमसीएच रुग्णालयाला मिळाले होते केवळ ४०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर

जीएमसीएच रुग्णालयाला १,२०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन पुरवठ्याची गरज होती. मात्र केवळ ४०० जम्बो सिलिंडर मिळाले होते. जर ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाला असेल तर ही कमतरता भरून काढण्यासाठी चर्चा होण्याची गरज आहे. राज्य सरकारने जीएमसीएच रुग्णालयातील उपचाराची देखरेख करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तीन सदस्यीय पथक नेमल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details