पणजी: गोव्यात आतापर्यंत 1688 लोकांच्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तपासण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामधील 1653 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 35 अहवालांची प्रतीक्षा आहे. तर 3 एप्रिलपर्यंत केवळ 7 जण पॉझिटिव्ह सापडले होते. ज्यांच्यावर कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले.
सोमवारी दिवसभरात केवळ 3 जणांना फेसिलिटी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 जणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर दिवसभरात 147 जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. गोव्यात 29 जानेवारीपासून आतापर्यंत 1794 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.