पणजी (गोवा) - कोरोनाच्या तीसऱ्या लाटेसाठी गोवा सरकारने पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत, तर बालरोग तज्ज्ञांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने ठरवलेल्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलचे पालन करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत गोव्यात कोरोनाने संक्रमित झालेल्यांपैकी ११ टक्के लोकं हे १७ वर्षांखालील मुले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
हेही वाचा -अमरावती : रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी चार जणांना पोलीस कोठडी; दोघे फरार
तीसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ५ ते १० जून दरम्यान तीसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी डॉकटर आणि इतर लोकांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाईल, तर पायाभूत सुविधा तयार आहेत. सावंत म्हणाले की, कोरोनाने संक्रमित मुलांवर उपचार करण्यासाठी खासगी आणि सरकारी क्षेत्रासाठी सामान्य एसओपी तयार केली गेली आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभाग, बालरोग तज्ज्ञांना एसओपी विषयी प्रशिक्षण देणार आहे, अशी शिफारस एम्सने केली आहे.
समुपदेशकही तयार केले जात आहेत
सावंत म्हणाले की, तीसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी समुपदेशकही तयार केले जात आहेत. राज्य शिक्षण विभाग, गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि महिला व बालकल्याण विभागातील लोक सल्लागार तयार केले जातील. त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविड संक्रमित असलेल्या ज्या मुलांना गृह अलगीकरणात ठेवले जाईल, त्या मुलांचे कडक निरीक्षण केले जाईल.