महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये गॅस गिझर फुटल्याने युवकाचा गुदमरून मृत्यू

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गौरव समाधान पाटील, असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाच नाव आहे.

गौरव समाधान पाटील
गौरव समाधान पाटील

By

Published : Jan 2, 2021, 3:59 PM IST

नाशिक - सिडको परिसरातील दौलत नगर येथील एका घरात बाथरूम मधील गॅस गिझर फुटला. त्यामुळे बाथरूममध्ये असलेल्या युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गौरव समाधान पाटील, असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाच नाव आहे.

गॅस गिझर फुटल्याने युवकाचा मृत्यू

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला मृत्यू-

नाशिकच्या सिडको दौलत नगर भागात गॅस गिझर फुटून झालेल्या स्फोटात एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गौरव आपल्या राधा वृंदावन अपार्टमेंट मधील राहत्या घरात आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यामुळे गौरवला श्वास घेण्यास त्रास झाला. यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गौरव बाथरूममध्ये गुदमरून पडला-

पवई येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला गौरव पाटील हा लॉकडाउन असल्याने नाशिकच्या घरी आला होता. सकाळी तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरी आल्यावर तो अघोळीला गेला परंतू गॅस गिझर जास्त तापले असल्याने त्यातून जास्त धूर निघाला. त्यामुळे गौरव बाथरूममध्ये गुदमरून पडला. गौरव बाहेर का येत नाही म्हणून गौरवच्या छोट्या मावसभावाने आवाज दिला परंतू त्याचा आवाज न आल्याने मावसभावाने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तर गौरव हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गॅस गिझर वापरणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे-

या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान नवं वर्षाच्या सुरुवातीलाच एका परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील गॅस गिझर स्फोट दुर्घटनेचा अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे गॅस गिझर वापरणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा-लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details