नाशिक- शहरातील भद्रकाली परिसरातील टॅक्सी स्टँडजवळ असलेला जुना वाडा कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र पांडुरंग बोरसे असे मृत तरुणाचे नाव आहे. वाडा कोसळल्याची ही घटना बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे.
नाशकात जुना वाडा कोसळून तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी
नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे भद्रकाली परिसरातील टॅक्सी स्टँड येथील बागुल नामक व्यक्तीचा वाडा बुधवारी पहाटे ४.३० वाजता कोसळला. यात ३ जणांना अग्निशामक दल आणि पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. तर एकाचा दुर्दैवी मुत्यू झाला असल्याची माहिती अग्निशामक दलाचे फायरमन शाम राऊत यांनी दिली.

पहाटेच्या सुमारास वाडा कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली. थोड्याचवेळात पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेल्या वाड्यातून ३ जणांना सुखरूप बाहेर काढले. यात वाडा मालक सुनील दामू बागुल, सुनीता बागुल , भाडेकरी राजेंद्र खराटे (वय 55) आदींना बाहेर काढले. तर यात भाडेकरू राजेंद्र पांडुरंग बोरसे या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरातील जुन्या आणि धोकादायक वाड्याचा प्रश्न
ऐरणीवर आला आहे.