महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

होय, शरद पवार माझा बापच - चित्रा वाघ - किशोर वाघ लाच प्रकरण

माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी मला बोलावून घेतले होते, यात तुझ्या पतीचा काही दोष नाही असे म्हटले होते. आज मला शरद पवार यांची खूप आठवण येत आहे. होय शरद पवार माझे बापच आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद
भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद

By

Published : Feb 27, 2021, 5:00 PM IST

नाशिक -माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी मला बोलावून घेतले होते, यात तुझ्या पतीचा काही दोष नाही असे म्हटले होते. आज मला शरद पवार यांची खूप आठवण येत आहे. होय शरद पवार माझे बापच आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर त्या नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.

राज्य सरकारने माझा आवाज दाबण्यासाठी माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मी याविरोधात न्यायालयीन लढा देईन, मात्र जोपर्यंत पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद

लाच प्रकरणाशी पतीचा संबंध नाही

चित्रा वाघ यांचा नवरा म्हणून माझ्या पतीवर गुन्हा दाखल करून, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाच प्रकरणात माझ्या पतीचा काडीचाही संबंध नाही. ज्या डॉ. गजानन भगत यांनी पैसे घेतले, त्यांची अद्याप चौकशी देखील झालेली नाही. मात्र मी गप्प बसणार नाही, पूजा चव्हाण सारख्या पीडितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी आवाज उठवत राहणार आहे. असेही यावेळी चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पूजा चव्हाण यांचे आई-वडील साधी माणसे आहेत. त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. पूजाला टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले गेले, माझा आक्षेप बंजारा समाजावर नसून, संजय राठोड यांच्यावर असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटंले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details