नाशिकमध्ये पावसामुळे चक्क मंडप टाकून रस्त्याचे काम सुरू... - मंडप
नाशिकमध्ये ञ्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रस्त्याचे काम वेळेत पुर्ण झाले नाही. म्हणून ठेकेदारांना चक्क मंडप टाकून काम करावे लागत आहे. प्रशासनाने अनेक वेळा नोटिस देऊनही काम पुर्ण न झाल्याने ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आला होता. ३१ ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत दिल्याने ठेकेदाराने पावसातही काम पुर्ण व्हावे म्हणून ही शक्कल लढवली आहे.
पावसामुळे चक्क मंडप टाकून रस्त्याचे काम सुरू...
नाशिक- गेल्या २ वर्षांपासून नाशिककरांची डोकेदुखी ठरलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रस्त्याचे काम वेळेत पुर्ण झाले नाही. म्हणून ठेकेदारांना चक्क मंडप टाकून काम करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने अनेक वेळा नोटीस दिल्या होत्या. त्यावर त्या ठेकेदारांना दंड देखील भरावा लागला. त्यामुळे भर पावसातही काम पूर्ण करण्यासाठी या ठेकेदारांनी अजब शक्कल लढवली असून, मंडप टाकून काम सुरू ठेवले आहे.