महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न

ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांचा मेळा भरला आहे. यामुळे रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त झाले.

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न

By

Published : Sep 4, 2019, 10:39 AM IST

नाशिक - ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांचा मेळा भरला आहे. यामुळे रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत स्नान केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी व धन प्राप्त होते, अशी धारणा असल्याने महिलांनी गर्दी केली.

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न

भाद्रपद मास शुक्ल पक्ष मुहूर्तावर येणाऱ्या पंचमीला ऋषि पंचमीचे हे व्रत करण्यात येते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. हे व्रत जीवनात पाप नाश मुक्तीसाठी करण्यात येते. तसेच हे व्रत केल्यास विवाहित महिलांची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे. महिला सप्त ऋषींची विधीनुसार पूजा करून सुख,शांती,समृद्धी,धन-धान्य,संतती प्राप्तीची मनोकामना करतात.

हेही वाचा भंडारा : ऋषीपंचमीनिमित्त वैनगंगा नदीकिनारी हजारो महिलांची पवित्र स्नानसाठी गर्दी

हळद, चंदन, फुलं, अक्षता यांचा अभिषेक करून क्षमायाचना केली जाते. अविवाहित महिलांसाठीही हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details