नाशिक :-इगतपुरी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शकुंतला अमृता रेरे असे महिलेचे नाव आहे. चिंचलेखैरे येथे रात्री एका शेतात एकटे राहत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. आणि जंगलात महिलेला फरफटत नेले असता, तिचा मृतदेह रविवारी आढळला. या परिसरात दोन बिबटे असल्याचा स्थानिकांनी अंदाज वर्तवला असून वन विभागाने येथे ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सदरच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard Attack in Nashik : नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार - leopard attck in nashik
इगतपुरी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शकुंतला अमृता रेरे असे महिलेचे नाव आहे. चिंचलेखैरे येथे रात्री एका शेतात एकटे राहत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला
![Leopard Attack in Nashik : नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार Leopard Attack](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14720867-1095-14720867-1647172258034.jpg)
Leopard Attack