महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dussehra 2022 : नाशिकचा रावणाशी काय आहे संबंध? सर्वतीर्थ म्हणजे काय? - जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे

महाराष्ट्रातील नाशिकचे रामायणाशी फार मोठे नाते आहे. असे म्हणतात की, रावण सिता मातेला पळवुन नेत असतांना, जटायू पक्ष्याने सिता मातेचे संरक्षण करण्यासाठी रावणावर What is relationship of Ravana with Nashik हल्ला केला होता. मात्र दृष्ट रावणाने आपल्या तलवारीने जटायूचे पंख कापले होते. ज्यामुळे जटायू पक्षी गतप्राम झाला होता. याच जटायूचे नाशिकातील टाकेड गावात मोठे मंदीर उभारल्या गेले आहे. Dussehra 2022

Dussehra 2022
जटायूची मोठी मूर्ती

By

Published : Oct 1, 2022, 7:43 PM IST

Updated : Oct 1, 2022, 8:50 PM IST

नाशिक :माता सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाचे जटायूशी युद्ध What is relationship of Ravana with Nashik झाले होते. या युध्दात मृत्यूमुखी पडलेल्या जटायूवर, श्रीरामांनी अग्निसंस्कार केले आणि जलांजली अर्पण केली होती. नाशिकपासून ५८ किमी घोटीजवळील टाकेड गावात जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. या ठिकाणाला स्थानिक लोकांमध्ये बरीच ओळख आहे. इथे लोक मोठ्या संख्येने पूजा करण्यासाठी पोहोचतात. तसेच ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले, तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला 'सर्वतीर्थ' What is Sarvatirtha असे म्हणतात. Dussehra 2022

टाकेदला कसे पोहचावे :नाशिकवरून इगतपुरी-घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. प्रथम घोटीपर्यंत जाऊन त्यानंतर सिन्नर रस्त्याने पिंपळगावमार्गे आधारवड गावातून टाकेदकडे जाता येते. घोटीपर्यंत जाण्यापूर्वी वाडीवऱ्हे व गोंदे या दोन गावांच्या मध्येच महामार्गावर लेकबिल फाटा लागतो. या रस्त्याने साकूरमार्गे कवडदरा रस्त्याने टाकेद गावात पोहोचता येते. नाशिकहून भगूरमार्गेही टाकेदला जाता येते. भगूर घोटी रस्त्याने कवडदरापर्यंत जाऊन टाकेद येथे जाता येते.

काय आहे बघण्यासारखे :नाशिकपासून जवळच असलेले टाकेद तीर्थ रामायणातील जटायू कथेमुळे पावन झाले. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले, तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. टाकेदपासून ४५ किलोमीटर अंतरावर भंडारदरा पर्यटन स्थळ आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेदला भेट देता येईल. जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले, ते जटायू मंदिर दुर्मीळ असे आहे.Dussehra 2022

Last Updated : Oct 1, 2022, 8:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details