महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकच गंगापूर धरण 80 टक्के भरले, पाण्याचा 3000 क्यूसेस विसर्ग सुरू - नाशिकराची पाणी कपात टळणार

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधारेमुळे 80 टक्केच्या वर धरण भरले असल्याने धरणातून गुरुवारी सकाळी 10 वाजता 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग दुपारी 4 वाजेपर्यंत टप्याटप्याने 3000 क्यूसेस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदी किनारी रहाणाऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकच गंगापूर धरण 80 टक्के भरले,
नाशिकच गंगापूर धरण 80 टक्के भरले,

By

Published : Jul 30, 2021, 10:49 AM IST

नाशिक- जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून धरण 80 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ सुरूच असल्याने गुरुवारी धरणातून 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर हा विसर्ग 3000 क्सूसेक पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधारेमुळे 80 टक्केच्या वर धरण भरले असल्याने धरणातून गुरुवारी सकाळी 10 वाजता 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग दुपारी 4 वाजेपर्यंत टप्याटप्याने 3000 क्यूसेस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदी किनारी रहाणाऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी कपातीचे संकट दूर होणार?
जून महिना कोरडा गेल्याने गंगापूर धरणाची पाणी पातळी खाली आली होती,त्यामुळे 40 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा धरणात शिल्लक होता ही बाब लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेने जुलै महिन्याच्या मध्यावर आठवड्यातुन एकदा पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता.आता शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 80 टक्के भरले असून पाणी कपात रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details