महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वॉटर ग्रेसची होणार चौकशी; तर कामकाजाला गती देण्यासाठी नोकर भरती करण्यास महासभेची मंजुरी - Water Grace

नाशिक शहरातील स्वच्छतेचे कंत्राट Water Grace कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांची लूट केल्याचे समोर आले आहे.यावरून महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ उडाला.

nashik
नाशिक

By

Published : Nov 18, 2021, 8:51 AM IST

नाशिक -नोकर भरतीसाठी बोलावण्यात आलेली नाशिक महानगर पालिकेची (Nashik Municipal Corporation) विशेष महासभा आज भलत्याच विषयाने वादग्रस्त ठरली. Water Grace या शहर स्वछता करणाऱ्या कंपनीकडून तरुणांची लूट केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाच्याच नगरसेवकांनी केला. यावरून महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. यावर Water Grace यांच्या ठेक्याची पूर्णपणे चौकशी करण्याचे आदेश महापौर सतिश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ

पालिकेचे कोट्यवधी नुकसान -

बुधवारी नाशिक महानगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा ही महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. या सभेमध्ये शहरात एकूणच कामकाज करण्यासाठी महानगरपालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे मानधनावर किंवा अन्य काही मार्गाने नोकर भरती करता येईल का याबाबत विषय ठेवण्यात आलेला होता. महापालिकेमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता नाही. तसेच अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे कामकाज अतिशय धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. म्हणून महानगरपालिकेत नोकर भरती करावी, अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकानी केली.

महासभेच्या कामकाजामध्ये शहरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वॉटर ग्रेस या ठेकेदाराला जे काम दिले आहे. त्यावरून सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदार कर्मचारी अतिशय वाईट पद्धतीने वागत आहे. योग्य कामकाज करीत नाही. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सभासदांनी केली. आक्रोश लक्षात घेऊन महापौर यांनी प्रथमदर्शनी योग्य कारवाई करण्याच आश्वासन दिले. परंतु ठोस आश्वासन मिळत नसल्याने नगरसेवक संतप्त झाले आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन कारवाईची मागणी केली. यावर हस्तक्षेप करत आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी प्रशासनाच्या वतीने या सर्व प्रकरणाबाबत पावले उचलले जातील, असे म्हटलं. तसेच पुराव्यानिशी तक्रार दाखल करावी, असेही त्यांनी म्हटलं. परंतु यावर नगरसेवक समाधानी झाले नाही. त्यामुळे हा गोंधळ मिटवण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी प्रशासनाला एक स्वतंत्र अधिकारी नेमून या वॉटर ग्रेस प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पुढील महासभेमध्ये याबाबतचा अहवाल सादर करावा म्हणजे योग्य तो निर्णय महासभेला घेता येईल असे आदेश दिले.


नोकर भरती अतिशय पारदर्शी असावी, कुठलाही गोंधळ नको -

या गोंधळानंतर पुन्हा नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या विषयावर चर्चेला सुरुवात झाली, त्यावेळी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी नोकर भरतीवरून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत शेवटच्या क्षणी भरती का करत आहे, यापूर्वी तुम्हाला सुचले नाही का, तुमच्या पक्षाचा हा अजेंडा आहे का, असे प्रश्न उपस्थित केले. यावर महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) आणि काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील (Hemlata Patil) यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर सभागृहामध्ये काँग्रेसचे शाहू खैरे यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले. महापालिकेचे आणि शहराच्या विकासासाठी नोकर भरती करावी अशी मागणी केली. परंतु ही नोकर भरती होताना अतिशय पारदर्शी असावी. त्यात कुठलाही गोंधळ नसावा, अशी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी मांडली. शहराच्या विकासासाठी आणि महानगरपालिकेच्या कामकाजासाठी योग्य त्या पद्धतीने नोकर भरती करावी असे आदेश प्रशासनाला दिले आहे, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details