नाशिक - पाणी कपातीचा निर्णय महापालिकेला घेऊ दया. सल्ला देणं माझ काम आहे. परिस्थिती बघून ते निर्णय घेतील असे सांगत महापालिका स्वायत्त आहे. भाजपला राग नको असा टोला लगावत पालकमंत्री भुजबळांनी पाणीकपातीचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात टोलावला आहे.
पाणी कपातीचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात - पालकमंत्री भुजबळ - nashik power cut news
कोरोना आढावा बैठकीनंतर शुक्रवारी भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते. गंगापूर धरणाचा जलसाठा ८० टक्के झाला आहे. पाणीकपातीचा निर्णय कधी रद्द होणार या प्रश्नावर भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे चेंडू टोलावला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाऊस पडत असला तरी जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये हवा तसा पाऊस अद्याप पडला नाही
जिल्हयात अपुरा पाऊस
कोरोना आढावा बैठकीनंतर शुक्रवारी भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते. गंगापूर धरणाचा जलसाठा ८० टक्के झाला आहे. पाणीकपातीचा निर्णय कधी रद्द होणार या प्रश्नावर भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे चेंडू टोलावला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाऊस पडत असला तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हवा तसा पाऊस अद्याप पडला नाही. दिंडोरीसह इतर तालुके कोरडे आहे. मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगदयातून पाणी प्रवाहित झाले नाही. काही दिवसांपूर्वी पाणी बोगद्यातून प्रवाहित झाले होते. मात्र पावसाअभावी पाणी प्रवाहित होणे बंद झाले. गतवर्षी आँगस्ट व सप्टेबर महिन्यात वरिल भागात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पुढील काळात चांगला पाऊस झाला तर परिस्थिती सुधारेल. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी परिस्थिती बाबत जिल्हाप्रशासनाने निर्णय घ्यावा, असे भुजबळांनी सांगितले आहे.
हेही वाचा -ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा