महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Marathi Sahitya Sammelan मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील, तर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे

नाशिक मध्ये येत्या 3 ते 5 डिसेंबर रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे असणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

Vishwas Patil and Javed Akhtar
विश्वास पाटील आणि जावेद अख्तर

By

Published : Nov 22, 2021, 10:36 PM IST

नाशिक -नाशिक मध्ये येत्या 3 ते 5 डिसेंबर रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे असणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा -नाशिक : भर पावसात संभाजीराजे छत्रपतींंनी सर केला विश्रामगड

नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी येथे 3 ते 5 डिसेंबर रोजी 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटक कोण? यावर बरीच चर्चा सुरू होती. अखेर संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पानिपतकार विश्वास पाटील हे संमेलनाचे उद्घाटक असतील, असे जाहीर केले. तर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे असणार आहे. तर, संमेलनाच्या समारोपासाठी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध

नाशिकला होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांचे नाव सुरवातीपासून घेण्यात आले होते. मात्र, विविध स्तरातून विरोध होत असल्याने उद्धाटक म्हणून विश्वास पाटील आणि अखेर अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले.

...असे होतील कार्यक्रम

पहिला दिवस : शुक्रवार दि. 3 डिसेंबर 2021

शुक्रवार दि. 03 डिसेंबर 2021 सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँड पर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजाराेहणाचा कार्यक्रम महामंडळाचे तसेच, संमेलन पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच, निमंत्रित. साहित्यिक, रसिक आदींच्या उपस्थिती हाेणार आहे. दुपारी 4.00 वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन हाेईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनाेगत आणि नविन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचे भाषण हाेईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.

रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन हाेईल. कवी श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चाैधरी हे करणार आहेत. या काव्य संमेलनासाठी सर्वश्री कवी दगडू लाेमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवि काेरडे, प्रिया धारुरकर, मनाेज बाेरगावकर, वैजनाथ अनमूलवाड, भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुरे, वाल्मिकी वाघमारे, इरान शेख, किशाेर बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय शंकर ढाले, तीर्थराज कापगते, मनाेज सुरेंद पाठक, विष्णू साेळंके, गजानन मानकर, मिनाक्षी पाटील, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रवीण बाेकुलकर, गीतेश शिंदे, मनाेज वराडे, वैभव साटम, गाैरी कुलकर्णी, संगिता धायगुडे, विलास गावडे, अमाेल शिंदे, अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार साेनवणे, विजय जाेशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश हाेळकर, उत्तम काेळगावकर, संदिप जगताप, मिलिंद गांधी, रेखा भांडारे, विष्णू भगवान थाेरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवळबाई दिघे, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दिपा मिरिंगकर, नीता शहा, प्रा. लक्ष्मण महाडिक, काशिनाथ वेलदाेडे, डाॅ. माधवी गाेरे मुठाळ, सुशिला संकलेचा आदी कवींना निमंत्रित केलेले असून, या कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कवी तर आहेतच शिवाय भाेपाळ, गाेवा आणि गुजरात या राज्यांतील कवीही निमंत्रित आहेत.

दुसरा दिवस : शनिवार दि. 4 डिसेंबर 2021

सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डाॅ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डाॅ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखकाचा व प्रकाशकाचा सत्कार करण्यात येताे. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनाेहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम हाेणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रुल्ल शिलेदार, किशाेर कदम (साैमित्र), सुचिता खल्लाळ, खालील माेमीन आणि वैभव जाेशी या कवींसमवेत श्री. विश्वाधार देशमुख आणि गाेविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.

परिचर्चा कार्यक्रम

दुपारच्या सत्रात ‘स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयाेजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डाॅ. एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जाेशी, रेखा इनामदार साने, डाॅ. गजानन जाधव आणि डाॅ. माेना चिमाेटे हे सहभागी हाेणार आहेत.

हेही वाचा -साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details