महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वैद्यकशास्त्रातील कौमार्य चाचणीचा उल्लेख अभ्यासक्रमातून वगळला : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय - कौमार्य चाचणी

वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात 'टू फींगर टेस्ट'चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पिडीत स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासण करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठा
आरोग्य विज्ञान विद्यापीठा

By

Published : Aug 3, 2021, 7:06 AM IST

नाशिक - बलात्कार पिडीत महिलांची कौमार्य चाचणी वैद्यकिय तज्ञाकडून घेतली जाते. ती कशी घ्यावी हे वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवले जाते. तसा उल्लेखही संबधित पुस्तकात आढळतो. हा विषय आता अभ्यासक्रमातून वगळला असल्याचा निर्वाळा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र पाठवून वरील निर्णय कळविला आहे.

वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात 'टू फींगर टेस्ट'चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पिडीत स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासण करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते.परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रिय आहे असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता.अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही.

कौमार्याच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन
कौमार्य चाचणी ही अवैद्यकिय असल्याचे अनेक तज्ञ डाॅक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे. वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डाॅ. इंद्रजित खांडेकर यांना अशा आशयाचा अहवाल आपणास दिला आहे. जात पंचायत कडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर आमच्या पुढाकारामुळे बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातुन काढून टाकण्यात यावा,अशी मागणी अंनिसने केली होती. आता देशस्तरावर अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिलच्या अभ्यासक्रमातुन हा विषय काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details