नाशिक- मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात मुक्त संचार करणारा बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कसारा घाटात रस्त्यावर फिरणाऱ्या बिबट्याचे वाहनचालकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
व्हिडिओ : कसारा घाटात बिबट्याचे दर्शन - नाशिक
वाहनचालकांनी मोठ्याने हॉर्न वाजवून बिबट्याला रस्त्याच्या बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या बराचवेळ रस्त्याच्या मधोमध फिरत होता.
बिबट्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, सतत येणाऱ्या वाहनांमुळे आणि वाहनांच्या प्रकाशामुळे तो थोडासा गोंधळलेला दिसत होता. वाहनचालकांनी मोठ्याने हॉर्न वाजवून बिबट्याला रस्त्याच्या बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या बराचवेळ रस्त्याच्या मधोमध फिरत होता.
रात्रीची वेळ असल्याने मोठी व अवजड वाहने वेगाने या रस्त्यावरून जात असल्याने काही वेळ बिबट्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गारवा आणि पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणावर येत आहेत. परंतु, बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.