नाशिक -मातृभूमीसाठी डोळ्यात तेल घालून कार्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकांबद्दल बिपीन रावत यांना कमालीची आत्मीयता होती. कोविड काळात तर सैनिकांची विशेष काळजी घेण्यासाठी ते नेहमीच संपर्कात रहायचे. त्यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं. माझा प्रत्येक क्षण देशासाठी असेच ते नेहमी म्हणत, असे मत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल (Former Lt General) डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar on Bipin Rawat death) यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी हवाई दलाच्याहेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने अवघा देश हादरून गेला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. यावेळेस त्यांच्या सहकारी असलेल्या माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि आता नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आयडीएसमध्ये गेली दोन वर्ष कानिटकर यांनी रावत यांच्यासोबत काम केले आहे.