नाशिक -नांदगाव तालुक्यात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश दुप्पटीने मोठा आहे. तेव्हा त्याचे अजून भाग करा. जिथे आवश्यकता आहे, तिथेच विभाजन करावे. महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू आहे. तेव्हा जे प्रश्न आहे त्यावरून लक्ष हटवण्याचे काम करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती... हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'
भाजप 2014 पूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत होता. मात्र, 2014 नंतर अगदी कालपर्यंत सत्तेत असताना कोणीच मागणी केली नाही. आत्ता काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आल्याने हे पुन्हा माणगी करत आहे की, वेगळा विदर्भ करा. मात्र, त्यांना विदर्भ वेगळा करण्यापेक्षा या राज्याचे तुकडे करण्यातच जास्त रस आहे. आम्ही मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्यांसोबत गद्दारी करणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"
नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. आपल्या खास शैलीत भाषण करताना त्यांनी, पत्रकारिता करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याची कल्पना आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या कार्यकाळात हे प्रश्न नक्कीच मार्गी लावू, असे प्रतिपादन भुजबळ यांनी यावेळी केले.