नाशिक- सिन्नर, येवला या तालुक्यांना आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. काही ठिकाणी हलकासा शिडकाव झाला असला, तरी सिन्नर व येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिमधील सिन्नर, येवला तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा; कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांचं नुकसान - डाळिंब
आज सायंकाळी सिन्नर, येवला येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. काही ठिकाणी हलकासा शिडकाव झाला असला, तरी सिन्नर व येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.
सिन्नरमधील खंबाळे, मरळ, सुरेगाव, पांगरी, वावी तसेच येवला तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह एक तास गारपीट झाली. सिन्नर व येवला या तालुका परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले असून कांदा, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुपारपासूनच वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला पावसाची काहीशी चाहूल लागली होती. तो धुव्वाधार बरसेल याचा अंदाज नसल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा व डाळींब, द्राक्ष या पिकांचे नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची ढगाळ वातावरणामुळे धाबे दणाणले असून आज नाशिक जिल्ह्यात सर्वच तालुक्यात तुरळक पाऊस बरसला आहे.