नाशिक- जुना आडगाव नाका परिसरातील रामरतन लॉज येथील बंद गाळ्यासमोर एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्ती अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. अज्ञात मारेकर्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या केली आहे. युवकाची हत्या कोणी आणि का केली याची माहितीही पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.
शुक्रवारी रात्री जुन्या आडगाव नाक्यावरून एक तरुण वाघाडीकडे जखमी अवस्थेत पळत गेला होता. त्यानंतर सेवा कुंज येथे तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या तरुणास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या युवकाचा मृत्यू झाला.
नाशकात अज्ञात युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या - body found with throat slit
नाशिकमध्ये एका अनोळखी तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची धारधर शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.
![नाशकात अज्ञात युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या नाशकात अज्ञात युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13031629-810-13031629-1631339913977.jpg)
नाशकात अज्ञात युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या
या प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले होते. पोलीस आता या तरुणाची हत्या कोणी केली, हत्येचे कारण काय याचा शोध घेत आहेत.