महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

येवल्यात पोळा सणानिमित्त बैलांवर रेखाटले अनोखे संदेश - बैलांवर रेखाटले अनोखे संदेश

कोरोनाचे सावट तसेच पावसाचा लहरीपणा त्यामुळे पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. पोळा सण हा येवला तालुक्‍यात शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. या वेळेस शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर अनोखा संदेश देत साजरा केला.

Yeola
yeola

By

Published : Sep 6, 2021, 10:13 PM IST

येवला - पोळा सणानिमित्त बळीराजाने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटत पोळा सण हा उत्साहात साजरा केला आहे.

येवल्यात पोळा सणानिमित्त बैलांवर रेखाटले अनोखे संदेश
बैलांवर रेखाटले अनोखे संदेशकोरोनाचे सावट तसेच पावसाचा लहरीपणा त्यामुळे पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. पोळा सण हा येवला तालुक्‍यात शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. धामणगाव येथील शेतकरी मधुकर सोनवणे व अभिषेक सोनवणे या शेतकऱ्यांनी पोळा सण घरीच साजरा केला. यानिमित्ताने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटले असून त्यात माझ्या धन्याच्या टोमॅटोला चांगला भाव द्या. शेतमालाला भाव नाही सांगा जगायचे कसे ? , कोरोनामुळे झाला शेतकऱ्यांचा वांधा, कांदा व शिमला मिरचीला हमीभाव द्या. असे अनोखे संदेश रेखाटत शेतकऱ्याने पोळा सण घरच्या घरी साजरा केला. कांद्याला भाव द्या तरच मत मागायला याबाळू फाळके या शेतकऱ्याने देखील आपल्या बैलांवर कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा ,कांद्याला भाव द्या तरच मत मागायला या असे अनोखे संदेश रेखाटत पोळा सण साजरा केला. हेही वाचा -करुणा मुंडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details