नाशिक -कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना राजकीय क्षेत्रातही कोरोनाने विळखा घातला आहे. यातच आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनाही कोरोनाची लागण (Dr. Bharati Pawar Cororna Positive) झाली आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ.भारती पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल केल्यावर पॉझिटिव्ह आला आहे. यांच्यापाठोपाठ नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse Corona Positive) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला .गोडसे हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह आले होते.
या नेत्यांनाही कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सागर मेघे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक, आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा -Bulli Bai App Case : 'माझी बहिण निर्दोष', श्वेता सिंहची धाकटी बहिण माध्यमांसमोर...