नाशिक- केंद्र सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी भरीव अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाशिक मेट्रो साठी 2 हजार 92 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे नाशिकच्या विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. मेट्रोसाठीच्या या निधीच्या तरतुदीवर नाशिककरांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद - budget 2021
नानाशिकमध्येही मेट्रो येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. नाशिक मेट्रोसाठी केंद्राने अशाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिला आहे.
नाशिककरांकडून निर्णयाचे स्वागत-
नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील तान वाढत आहे. त्या दृष्टीने मेट्रोसारख्या जलद आणि सोयीच्या वाहतूक व्यवस्था या काळाची गरज बनल्या आहेत. आता केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागपूर पाठोपाठ नाशिक मध्ये मेट्रोची घोषणा केली. यासाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.