महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बोलण्यात गुंतवून सोने लंपास करणाऱ्या दोन महिला अटकेत - नाशिक गुन्हेगारी बातमी

नाशिकच्या आडगाव पोलीस आटणे परिसरात एका सराफा दुकानातून काही महिलांनी बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही

By

Published : Dec 31, 2020, 5:13 PM IST

Updated : Dec 31, 2020, 5:41 PM IST

नाशिक - सराफा दुकानांत डल्ला मारणाऱ्या एका महिला टोळीला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या टोळीतील महिलांनी सराफा दुकानात चोरी केल्याची माहिती ही उघड झाली आहे. आडगाव पोलीस ठाणे परिसरात आर के ज्वेलर्समध्ये या महिला टोळीने सराफ व्यावसायिकाला गुंगारा देत काही दागिने लंपास केले होते. ती सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याबाबत ज्वेलर्सच्या मालकाने पोलिसात तक्रार दिली होती.

बोलताना पोलीस अधिकारी

दोन महिला गजाआड तर एक फरार

सध्या नाशिक शहरात सराफा दुकानात प्रवेश करून सराफ व्यावसायिक आणि सेल्समन्सना गुंगारा देत सोन्या-चांदीचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणी या टोळीने चोरी केल्याने सराफा व्यवसायिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यवसायिक करत होते. पोलिसांनी आपली सुत्रे फिरवत टोळीतील दोन महिलांच्या मुसक्या आवळ्या असून एका महिलेचा तपास सुरू आहे.

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

ताब्यात असलेल्या महिलांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सराफ दुकानात चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यामुळे आणखी काही गुन्हे उडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -दिंडोरी तहसील कार्यालयात घुसले गोवंश, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

हेही वाचा -नवीन वर्ष घरात राहूनच साजरे करावे; जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचे नाशिककरांना आवाहन

Last Updated : Dec 31, 2020, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details