नाशिक -डोक्यात दगड घालून एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शहरात गुरुवारी पहाटेच्या 3 च्या सुमारास घडली. अनिल गायधनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सरकारवाडा पोलिसांनी दोन तासात दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नाशिक शहरातील रामसेतू पूल परिसरातील राजहंस दुकानाजवळ गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस तपास सुरू केला. त्यावेळी हा मृत व्यक्ती अनिल गायधनी असून तो एका हॉटेल मध्ये मागील तीन महिन्यापासून आचारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले.
नाशकात डोक्यात दगड घालून एकाची हत्या, दोन तासात संशयित ताब्यात - खून प्रकरणी दोघांना अटक
गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस तपास सुरू केला. त्यावेळी हा मृत व्यक्ती अनिल गायधनी असून तो एका हॉटेल मध्ये मागील तीन महिन्यापासून आचारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले.
नाशकात डोक्यात दगड घालून एकाची हत्या,
पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन तासातच संशयित शुभम मोरे आणि एका संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित शुभम याच्या वडिलांचा भेळ भत्याचा व्यवसाय असल्याचे समजते. आपापसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.