दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे विहरीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटणा घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील विळवंडी (नाईकवाडी रस्त्या) लगत पारधी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील पदमा उत्तम पारधी (इयत्ता 5 वी) व फशाबाई उत्तम पारधी (इयत्ता 4 थी) यांचा विहरीत पडून मृत्यू झाला आहे.
जीव वाचवण्यासाठी ठरल्या अयशस्वी-
शनिवारी सकाळी ठीक 7 वाजता या दोन बहिणी दर दिवशीप्रमाणे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या. दरम्यान, पाणी काढत असताना एका बहिणीचा पाय घसरला व ती विहिरीत पडली. आपली बहीण विहिरीत पडली हे बघून दुसऱ्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यात त्या आपला जीव वाचवण्यासाठी अयशस्वी ठरल्या. व काळाने घाला घातला. यात त्या दोन्ही बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.