महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Ganeshotsav पर्यावरण वाचविण्याचा श्रीगणेशा, नाशिकमध्ये 1 लाख 97 हजार मूर्तींसह 144 मेट्रिक टन निर्माल्य संकलन - नाशिकमध्ये 1 लाख 97 हजार मूर्तीं

Nashik Ganeshotsav नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जनात (Ganesh Visarjan) सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्यासह 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे.

गणेश विसर्जन
गणेश विसर्जन

By

Published : Sep 10, 2022, 10:56 PM IST

नाशिकनाशिक महानगरपालिकेत पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले या उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचे संकलन करण्यात आले. Ganesh Visarjan Nashik याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनात सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. Nashik Ganeshotsav तर 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे. मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे.

महानगरपालिकेच्या सहा विभागात एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात आले. Ganesh Visarjan 2022 यासाठी बांधकाम विभागाने कृत्रिम तलाव उभारले होते, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. 'मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव' या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

सामजिक संस्थांची मदतनिर्माल्य जमा करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. के. के. वाघ कॉलेजचे 300 विद्यार्थी, वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार सोनवणे बिटको कॉलेज, विजय सुकटे व त्यांचे 100 स्वयंसेवक, Ganesh Immersion दिल्ली पब्लिक स्कूल, पोलिस मित्र आडगाव पोलीस स्टेशन यांचेकडील 50 स्वयंसेवक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे 50 स्वयंसेवक, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्या प्रत्येकी 25 सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कुलच्या 100 कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग नोंदवला आहे.

144 मेट्रिक टन निर्माल्य संकलन

पूर्व विभाग - 21290 किलो ग्रॅम

पश्चिम विभाग - 13940 किलो ग्रॅम

नाशिक रोड - 20545 किलो ग्रॅम

पंचवटी विभाग - 36010 किलो ग्रॅम

सिडको विभाग - 22275 किलो ग्रॅम

सातपूर विभाग - 29845 किलो ग्रॅम

एकूण - 143.905 मेट्रिक टन

1 लाख 97 हजार 488 मूर्ती संकलित

पंचवटी - 72866

सिडको - 17828

नाशिक रोड - 50597

नाशिक पश्चिम - 10508

नाशिक पूर्व - 20478

सातपूर - 25211

एकुण - 1,97,488

टॅंक ऑन व्हील (फिरता तलाव)

नाशिक रोड- 31

पंचवटी - 72

सिडको - 146

सातपूर - 132

एकूण - 381

ABOUT THE AUTHOR

...view details