महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 29, 2022, 4:00 PM IST

ETV Bharat / city

Nashik Crime : पिस्तूल आणि काडतुसे विक्री करणाऱ्या दोघांना नाशिकमधून अटक

दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. टेकचंद दालचंद खेरी (30), दयाचंद जयपाल (25) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान फेब्रुवारीमध्ये पिस्तुल आणि काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला होता.

संशयित आरोपी
संशयित आरोपी

नाशिक - दिल्लीत पिस्तुल आणि काडतुसे विक्री करणार्‍या दोघा जणांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. टेकचंद दालचंद खेरी (30), दयाचंद जयपाल (25) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान फेब्रुवारीमध्ये पिस्तुल आणि काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून फरार असलेल्या टोळीचा दिल्ली पोलीस शोध घेत होते. हे दोघे संशयित दिल्लीतून फरार झाले होते. त्यानंतर नाशिकमध्ये मित्रांच्या सहायाने वास्तव्याला होते. दिल्ली पोलिसांनी ओझर गुन्हे शोध पथकाच्या मदतीने ही कार्यवाही केली आहे.

ताब्यात घेतलेले संशयित फरीदाबादचे रहिवासी :हे दोघेजण एयर फोर्समध्ये कामाला आहे, असे सांगून मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथील उषा हॉस्पिटल जवळ हेवन हाईट्स या बिल्डिंगमध्ये भाड्याने वास्तव्यास होते. संशयित नाशिकमध्ये असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. ओझर भागातून या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या दोघा जणांचा ताबा दिल्ली पोलिसांकडे दिला असून दिल्ली पोलीस आता या टोळीतील इतर जणांचा कसून शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेले दोघेजण फरीदाबाद हरियाणाचे रहिवासी असून या दोघांच्या अटकेमुळे राज्यातील पिस्तुल, काडतुसे विक्री करणारे मोठे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दिल्ली व आसपासच्या ठिकाणी गुन्हे करून फरार झाले होते : या सराईतांवर दिल्ली व आसपासच्या पोलीस ठाण्यात खून दरोडे विदेशी शस्त्र वापरने या सारखे गंभीर गुन्हे दाखल होते. हे सराईत गुन्हेगार दिल्ली व आसपासच्या ठिकाणी गुन्हे करून फरार झाले होते. याबाबत दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत असतांनाच त्यांना गुप्त माहीतगाराकडून त्यांच्या ठिकाणाचा शोध लावला.

हेही वाचा -Molested with Minor Girl :अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details