नाशिक -बिंगो, रौलेट किंगच्या ( Bingo Online Gamble ) माध्यमातून ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ( Two Arrest For 45 Lakh Fraud ) नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रीतम राजेंद्र गोसावी (26), कैलास जोगेंद्र प्रसाद शहा (32), असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील कैलास शहा विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली आहे.
Nashik Online Gamble Case : बिंगो, रौलेट जुगार चालवणाऱ्या दोघांना अटक, ४५ लाखांची केली फसवणूक
बिंगो, रौलेट किंगच्या ( Bingo Online Gamble ) माध्यमातून ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ( Two Arrest For 45 Lakh Fraud ) नाशिक ग्रामीण पोलिसांनी ( Nashik Gramin Police ) दोघांना अटक केली आहे. प्रीतम राजेंद्र गोसावी (26), कैलास जोगेंद्र प्रसाद शहा (32), असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
रोलेट, बिंगो चालविणारे दोघे गजाआड -ऑनलाईन जुगार खेळण्याची तरुणांमधील क्रेझ वाढत आहे. यामुळे तरुणाई कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. अशाच एका ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या दोघा जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रोलेट किंग कैलाश शहाला आणि प्रीतम राजेंद्र गोसावी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही संगनमतानं तरुणांना ऑनलाईन बिंगो रोलेट जुगार खेळण्यास प्रवृत्त करत होते. या दोघांनी रामा रसाळ नावाच्या व्यक्तीला कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून बिंगो रौलेट जुगारमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. तसेच त्याचा विश्वास संपादन करून त्याची फसवणूक केली. दरम्यान, या प्रकरणी रामा रसाळ याने फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.