नाशिक -त्र्यंबकेश्वर दुगारवाडी धबधबा परिसरात अडकलेले 22 पर्यटकांची सुटका,एक जण वाहून गेला आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी त्रंबकेश्वर परिसरातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या दुगारवाडी धबधबा परिसरात 23 जण अडकले होते. मध्यरात्री पोलिस, महसूल, वन क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव मोहीम राबवण्यात आली होती. यात 22 तरुणांना वाचवण्यात यश आला असून यात एक जण वाहून गेला आहे.
दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले -काल रविवारची सुट्टी असल्याने नाशिक हुन 28 जण त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते. अशात सांयकाळी पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसाने धबधबा ओलांडून गेलेल्यापैकी 5 जण कसे बसे आले. अशात धबधब्यावर पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे साधारण 23 जण पलिकडच्या बाजूला अडकून राहिले होते. पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल, या आशेवर वाट पहात बसल्याचा रात्री धीर खचू लागला होता.
मध्यरात्री सुखरूप बाहेर काढण्यात आले -त्यात त्या भागात मोबाईल रेंज नसल्याने हा सगळा प्रकार लक्षात यायला उशीर झाला. यानंतर त्रंबकेश्वर आणि नाशिक येथून तात्काळ पथक रवाना करण्यात आला आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, आणि पोलिस, महसूल, वन क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने 22 पर्यटकांना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.