महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Trainee nurse commits suicide : नाशिकात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या - परिचारिका आत्महत्या नाशिक

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील ( Trainee nurse commits suicide Nashik ) परिचारिका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज समोर आले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Trainee nurse commits suicide
परिचारिका आत्महत्या नाशिक

By

Published : Jun 15, 2022, 12:20 PM IST

Updated : Jun 16, 2022, 10:18 AM IST

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील ( Trainee nurse commits suicide Nashik ) परिचारिका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज समोर आले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

माहिती देताना जिल्हा वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा -मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे होणार निवृत्त, नव्या आयुक्त पदासाठी 'या' नावांची चर्चा

माधुरी काशिनाथ टोपले (वय 19) असे प्रशिक्षणार्थी परिचारिकेचे नाव आहे. माधुरीने परिचारिका महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी
ही घटना उघड झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. माधुरीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिकणाऱ्या माधुरी टोपले या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत आम्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य तसेच तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणींशी चर्चा केली. यात माधुरीला कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास नव्हता, असे आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करतील, असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक थोरात यानी सांगितले.

हेही वाचा -BMC RAT kiiling : मुंबई पालिकेने पाच वर्षांत मारले १६ लाख ४५ हजार उंदीर

Last Updated : Jun 16, 2022, 10:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details