पेठ - नाशिक महामार्गावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
नाशकात भरधाव कंटेनरच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू - Accident breaking news
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा सप्ताहला गालबोट लागले आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताहात दुर्दैवी घटना-
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा सप्ताहला गालबोट लागले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नाशिक-पेठ महामार्गावर कर्तव्य बजावत असलेले पोलीस हवालदार कुमार गायकवाड हे नेहमी प्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. तपासणी करीत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हवालदार कुमार गायकवाड यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर चालकाला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा-चित्तूर मुलींची हत्या प्रकरण : मुलीला मारल्यानंतर आईने तिची जीभ खाल्ली