महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Chhagan Bhujbal : माझ्याच पतंगावर सगळ्यांचा डोळा, मी माझी पतंग वाचवता वाचवता थकलोय - छगन भुजबळ - Chhagan Bhujbal marathi latest news

माझ्या पतंगावर सगळ्यांचा डोळा आहे. मी कोणाचा पतंग कापण्याचा धंदा करत नाही. मी माझी पतंग वाचवता वाचवता थकलोय, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal On kite ) यांनी दिली.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

By

Published : Jan 15, 2022, 7:13 PM IST

येवला ( नाशिक ) - पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवल्यात विविध विकास कामांचे उद्घाटन ( Chhagan Bhujbal In Yeola ) केले. यानंतर अनेकांच्या पतंग कापल्या आहेत, तुमची पतंग कोण कापणार, असा प्रश्न माध्यमांनी भुजबळ यांना विचारला. तेव्हा, माझी पतंग कापण्यासाठी प्रत्येक जण तयार असून, मी कोणाच्या पतंग कापण्याचा धंदा सुद्धा करत नाही. मी माझी पतंग वाचवता वाचवता मी थकलोय, असेही ( Chhagan Bhujbal On kite ) त्यांनी म्हटले.

येवल्यात विकास कामांचे उद्घाटन उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ पतंगोत्सवात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी पतंगबाजीचा आनंद घेतला. यानंतर अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात गेल्या आहेत, असे प्रसारमाध्यमांनी विचाराले असता, भुजबळ ( Chhagan Bhujbal Anjali Damaniya ) म्हणाले ( की, "मी एवढी काळजी करत नसून न्यायालयाने आम्हाला केस मधून केले आहे. माझीच पतंग प्रत्येक जण कापण्यासाठी तयार असून मी कोणाच्या पतंग कापण्याचा धंदा सुद्धा करत नाही. माझ्याच पतंगावर सगळ्यांचे लक्ष असते. माझी पतंग वाचवता वाचवता मी थकलो असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली."

महाराष्ट्र सदन प्रकरणी दमानिया उच्च न्यायालयात

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या विशेष न्यायालयाने कथित महाराष्ट्र सदन घोटाळातून मंत्री छगन भुजबळ, त्यांचे कुटुंबीय आणि व्यावसायिक चमणकर यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा -Sushilkumar Shinde Criticized Bjp : भाजपाच्या हुकूमशाहीला लोक कंटाळलेत - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details