नाशिक - नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे साई भक्त मुंबईहून शिर्डीकडे दुचाकीवरून जात होते. यामध्ये एक साई भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला. अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
नाशकात ट्रकने दुचाकीला उडविले; तीन साईभक्त ठार, एक जखमी - accident breaking news nashik
नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अज्ञात ट्रकने दुचाक्यांना उडविले-
मुंबई विलेपार्ले येथून शनिवारी सायंकाळी १५ साई भक्त दुचाकीवरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. विल्होळी नाक्याकडून नाशिककडे जाताना सिडकोतील लेखानगर उड्डान पुल येथे रविवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात ट्रकने दुचाक्यांना उडविले. यात वैजनाथ चव्हाण (21), सिध्दार्थ भालेराव (22), आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे (17) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-'इतिहासात पहिल्यांदाच इतके अहंकारी सरकार सत्तेवर, कायदे तत्काळ मागे घ्या'