महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maleagaon Lake मालेगावच्या हिलस्टेशन तलावात तिघांचा बुडून मृत्यू - Malegaon Hill Station Lake

मालेगावच्या हिल स्टेशन भागातील तलावात Malegaon Hill Station Lake तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू children death in Malegaon lake झाल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शकील तैराक आणि किला तैराक गृपने रेस्क्यू ऑपरेशन करत या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

children death in Malegaon lake
मालेगावच्या हिलस्टेशन तलावात मृतदेह शोधताना जलपटू

By

Published : Aug 12, 2022, 10:25 PM IST

मालेगाव मालेगावच्या हिल स्टेशन भागातील तलावात Malegaon Hill Station Lake तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू children death in Malegaon lake झाल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शकील तैराक आणि किला तैराक गृपने रेस्क्यू ऑपरेशन करत या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे. त्यांना सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तिघेही मुले नुराणी नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या भागावर शोककळा पसरली आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने गमावला जीव-आज शुक्रवार सुट्टीचा दिवस असल्याने मालेगावमधील बहुतांश लोक हे आजूबाजूला फिरायला जातात. सध्या पाऊस चांगला झाला असल्याने तलावात व नदीला भरपूर पाणी आहे. याठिकाणी देखील नागरिक फिरायला जातात असेच नुमान अकतर शेख अकतर, मोहम्मद शेख, मेहफुज रहेमान हे तिघे मित्रासोबत फिरायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडाले. या घटनेची माहिती स्थानिक न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीनी शकील तैराक व किला तैराक ग्रुपला कळवली. त्यांनी तात्काळ धाव घेऊन तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांना सध्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहे.

15 दिवसात तिसरी घटना -मालेगाव शहरात गेल्या 15 दिवसात ही तिसरी घटना घडली आहे. याआधी दोन दिवस अगोदर दोन मुले मोटारसायकल सकट पाण्यात वाहून गेले होते. तर याआधी एका तरुणाने पाण्यात स्टंट बाजी केली. यादरम्यान तोही वाहून गेल्याची घटना घडली होती.

हेही वाचा-Nude Video कंत्राट न दिल्याने अभियंत्याचा नग्न व्हिडिओ बनवला

ABOUT THE AUTHOR

...view details