नाशिक - कोरोनामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये तिन महिन्याचा बळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या या बाळाला ईतरही काही गंभीर आजार होते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधिल पहिलीच घटना आहे.
तिन महिन्याचे बाळ कोरोनामुळे दगावले, नाशिक शहरातील धक्कादायक घटना बाळाला होते ईतरही काही गंभीर आजार -
गेल्या वर्षभरापासून देशभरासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहरच घातला आहे यात एप्रिल महिन्यात नाशिक शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 70 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. आत्तापर्यंत जवळपास 1 हजार 923 जणांचा बळी देखील गेला आहे. मात्र, बुधवारी यात एका तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी झाल्याने शहरभरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. रोनामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये तिन महिन्याचा बळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या या बाळाला ईतरही काही गंभीर आजार होते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधिल पहिलीच घटना असून या बाळाला इतरही आजार असल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याचे मनपाच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.
लहान मुलांना घरातील इतर लोकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो -
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुलांना घरातील इतर लोकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आव्हान पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे.