नाशिक -नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा प्रकोप वाढत चालला आहे. गुरुवारी 28 तारखेला शहरात तिघांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची दाट शक्यता ( Three Death Heat stroke In Nashik ) आहे. हवामान खात्याकडून देशभरातील विविध राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातील दिसू लागले आहे. आज ( 28 एप्रिल ) मालेगावात पारा 43.4 अंश तापमानाची नोंद झाली. तर, नाशिक शहरात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिकमधील वाढत्या उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, तीन नागरिकांचे चक्कर येऊन पडल्याने त्यांचा जीव गेला आहे. प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खरात हे जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आले होते. तेथे त्यांना चक्कर आली. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत नाशिक रोड येथील महाराष्ट्र अलटो इंजिनियर अँड रिसर्च अकादमीत सुरु असलेल्या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून बदलापुरचे विकास वामन भावे आले होते. ते पंचाचे काम करत असतानाच चक्कर खाली कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तर, तिसरी घटना मखमलाबाद गावात घडली. नाशिक रोडचे मोहन वर्मा हे मित्रासोबत बोलत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.