नाशिक - शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गोविंद नगर येथे मार्क मॉल या सुपर मार्केट स्टोअरमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे. चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नाशकात मॉलमध्ये चोरी; दोन लाखांची रोकड लंपास करून चोरटे पसार - नाशिक क्राइम
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गोविंद नगर येथे मार्क मॉल या सुपर मार्केट स्टोअरमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे. चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या मार्क मॉल या सुपर मार्केटमधून दोन चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या सामानाची चोरी केली आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना तपासाची चक्र फिरवायला मदत झाली आहे. याबाबत दुकान मालकांनी पोलिसात तक्रार केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सर्वच व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.