नाशिक :राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. बाजार मंडणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या (Former MP Kirit Somaiya) यांनी केली. राज्यात 10 जून रोजी राज्यसभेची निवडणुक होणार आहे. राज्यसभेच्या 6 जागेसाठी सध्या सर्व पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून राज्यातले वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवसेना नेत्यांवर कडाडून टिका (Somaiya criticized Shiv Sena) केली आहे.
तेरा क्या होगा कालिया:नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयांत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्ला केला. सोमैय्या म्हणाले की, सचिन वाझे, (Sachin Waze) बजरंग खरमाटे जर माफीचे साक्षिदार झाले आहेत. वाझेच्या वसुली मधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले अस, अस जर वाझेनीच सांगितलं तर 'तेरा क्या होगा कालिया' असा टोला त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांना लगावला. सचिन वाझेनी जर सांगितलं की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे (CM Uddhav Thackeray) झाली तर सत्य बाहेर येईन. बेईमान कोण आहेत सेनेचे आमदार की, त्यांना समर्थन देणारे नेते हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) भ्रष्टचारी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असे देखील ते म्हणाले.