नाशिक - अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या संबंधित व्यवहाराबाबत ( Minister Nawab Malik Case ) चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे पथक ( ED inquiry in Nashik ) नाशिकच्या एका भंगार व्यवसायिकाची चौकशी केली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. यामुळे सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमधील ( Scrap Market ) भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
नेहमीच चर्चेतला भंगार बाजार -सातपूर अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार व्यवसाय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होऊनही हा भंगार बाजार अजूनही तसाच आहे. भंगार मार्केटधील विक्रेत्यांचे संबंध उत्तर भारतीय नेत्यांशी आहे. तसेच अबू आझमी, कृपा शंकर सिंग, नवाब मलिक यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचे नातेवाईक या व्यवसायात असल्याचे बोलले जाते. भंगार व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभामुळे स्थानिक प्रशासनही कारवाई करताना हात आखडत असतात.