महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करावी - छगन भुजबळ - नाशिक छगन भुजबळ

शासनाच्या क्रीडा धोरणानुसार नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा संकुलासाठी जिल्हा परिषदेकडून करार पद्धतीने जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर वापरण्यायोग्य नसलेले बांधकाम काढून टाका. त्याजागी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन सर्व क्रीडाविषयक आवश्यक सोयी सुविधा खेळाडूंना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करावा, असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

nashik chhagan bhujbal
छगन भुजबळ

By

Published : Nov 10, 2020, 12:34 PM IST

नाशिक -जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे, अशा खेळाडूंचे अनुभव येणाऱ्या भावी खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरतील. या दृष्टीने तसेच भावी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकूल समितीच्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शासनाच्या क्रीडा धोरणानुसार नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा संकुलासाठी जिल्हा परिषदेकडून करार पद्धतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर वापरण्यायोग्य नसलेले बांधकाम काढून त्याजागी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन आर्किटेक्चर व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनाने इनडोअर व ऑऊट डोअर खेळांच्या अनुषंगाने सर्व क्रीडाविषयक आवश्यक सोयी सुविधा खेळाडूंना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करावा. सर्वसमावेशक असा क्रीडा संकुलाचा नवीन आराखडा येत्या 15 दिवसांत तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले आहेत.

हेही वाचा -'मास्क न घालणार्‍यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवा; दुप्पट दंड आकारा'

प्रेक्षक गॅलरीची क्षमता वाढवण्यावर भर -
क्रीडा संकुलात विविध खेळांच्या अनुषंगाने खेळाडूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांसाठी सुविधायुक्त अशा प्रेक्षक गॅलरीची क्षमता वाढविण्यावर देखील लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. क्रीडांगण, कॅफेटेरिया, प्रशासकीय इमारत, खेळाडूंच्या मुलभूत गरजा असलेल्या या बहुद्देशीय जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना सध्या उपलब्ध निधीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा आणि त्यानुसार आराखडा तयार करून कामास सुरूवात यावी, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाच्या सद्यस्थितीबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
हेही वाचा -...तर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल- छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details