नाशिक: समृध्द असलेल्या नाशिक च्या ग्रामीण भागात शेंद्री पाडा भागात महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालुन नदीवर दोन बल्या वरुन जावे लागते. हा प्रकार समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्ह्यायरल होत होती. जीव मूठीत घेऊन महिला पाण्यासाठी करत असलेला संघर्ष पाहून तत्कालीन पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लोखंडी पूल बांधून दिला. मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफान पावसात आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेत बांधलेला हा पुल देखील वाहून गेला. आणि महिलांच्या नशिबात पुन्हा लाकडी बल्यावरुन चालत जाण्याची वेळ आली आहे.
सोशल मीडियाने केले उघड :काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हांडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठया प्रमाणत व्हायरल झाला त्यामुळे या महिलांची समस्या जगासमोर आली. या व्हिडीओची दखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. यानंतर आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती यातच हा पुल वाहुन गेला.
जानेवारीत झाले होते उद्घाटन:आदित्य ठाकरे यांनी जानेवारी 2022 मध्ये प्रत्यक्ष शेंद्री पाड्याला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. महिलांच्या सोयीसाठी पूल बांधून दिला होता. अवघ्या 3-4 दिवसात हा पूल उभा राहिला होता. पण आता पहिल्याच मोठ्या पावसात तो वाहून गेल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्राप्त माहिती नुसार हा पूल 30 फूटापेक्षा अधिक उंचीवर बांधण्यात आला होता. इतक्या कमी उंची वरील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जाईल तेव्हा तो वर बांधावा असे स्थानिकांनी सूचवले होते पण अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप स्थानिकांनी केले होते.