महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जीएसटी करप्रणालीविरोधात नाशकात एकवटले कर सल्लागार - Nashik agitation news

संपूर्ण महाराष्ट्रात कर सल्लागार असोसिएशनकडून आंदोलन छेडण्यात येत असून नाशिकमध्येही त्रिमूर्ती चौक परिसरात आणि पाथर्डी फाटा जीएसटी भवनसमोर हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले आहे.

Nashik
Nashik

By

Published : Jan 29, 2021, 3:32 PM IST

Updated : Jan 29, 2021, 8:51 PM IST

नाशिक - जीएसटी भारतात येऊन साधारण साडेतीन वर्षे झाली, मात्र या करप्रणालीत वारंवार काही ना काही बदल करण्यात येत असल्याने त्यांचा प्रचंड त्रास व्यापारी तसेच कर सल्लागारांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात कर सल्लागार असोसिएशनकडून आंदोलन छेडण्यात येत असून नाशिकमध्येही त्रिमूर्ती चौक परिसरात आणि पाथर्डी फाटा जीएसटी भवनसमोर हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले आहे.

जाचक अटींमुळे तणावाचे वातावरण

मागील तीन वर्षांपासून कर सल्लागरावरील खूप ताण वाढला आहे. त्यात कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करताना साइट जॅम होणे किंवा दहा मिनिटांचा अवधी घेणे अशा अनेक अडचणींमुळे कर सल्लागारांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याने यात तातडीने सुधारणा करण्यात यावी व कर सल्लागारांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी असोसिएशनकडून केली जात आहे.

'खासदारांनी अर्थमंत्र्यांना निवेदन द्यावे'

जीएसटी भारतात येऊन साधारण साडेतीन वर्ष झाले पण या साडेतीन वर्षात जवळपास दर आठवड्याला जीएसटीत बदल होत असतात. त्याला प्रचंड त्रास हा व्यापाऱ्यांना आणि कर सल्लागारांना मोठ्या प्रमाणात होत असतो. येणाऱ्या नवीन जाचक अटीमुळे फॉर्ममध्ये ऐनवेळी होणारे बदल होत असतात. कायद्यामध्ये किचकट होणारे बदल यामुळे प्रचंड मानसिक त्रास सर्वांना सहन करावा लागतो. परंतु कर सल्लागारांना 365 प्रचंड तणावाखाली काम करत असतात फॉर्म अपलोड करताना जीएसटी व इन्कम टॅक्सची साइट जॅम होणे किंवा त्यासाठी फक्त दहा मिनिटांचा अवधी घेणे, त्यामुळे काम वाढले आहे. वेळ खूप जातो. प्रत्येक व्यवहार बारीक-सारीक तपशिलासह अपलोड करणे, अशा एक ना अनेक अडचणींमुळे कर सल्लागारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व कर सल्लागार संघटनांनी खासदारांना निवेदन दिले असून खासदारांनी असोसिएशनच्या वतीने आदरणीय अर्थमंत्र्यांना निवेदन द्यावे, अशी संघटनेने विनंती केली आहे.

Last Updated : Jan 29, 2021, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details