नाशिक - महानगरपालिकेने ७०० सफाई कर्मचाऱयांच्या बदल्या या ठेकेदारांना पोसण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप करत गुरुवारी सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नाशिक महापालिकेबाहेर करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात शहरातील अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
नाशिक पालिकेच्यावतीने सुमारे 700 सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बदल्या कामगारांवर अविश्वास दाखवून ते ठेकेदारांना पोसण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने या बदल्या त्वरित रद्द कराव्यात, सफाई आऊटसोर्सिंग ठेकेदारी रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी नाशिक महानगरपालिके बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.