महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2019, 7:16 PM IST

ETV Bharat / city

घरकुल घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले सुरेश जैन रुग्णालयात दाखल

राज्यातील गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणातील सुरेश जैन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.

सुरेश जैन जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशीक -राज्यातील गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणात नाशिक रोड तेथील कारागृहात शिक्षा भोगत असलेले मुख्य आरोपी सुरेशदादा जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेशदादा जैन यांना मधुमेह, अति उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय होता जळगाव घरकुल घोटाळा -

तात्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनासाठी स्वस्तात चांगली घरे बांधून देण्याची योजना आखली होती, त्यासाठी हुडको कडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आले, दरम्यान योजनेच्या कामात अनियमितता असल्याने 2001 मध्ये उघडकीस आला होतं, तसेच पालिकेने ज्या जागेवर घरे बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नसल्याचं समोर आले.

जळगाव मधील हरि विठ्ठल नगर, खंडेराव नगर, समता नगर आणि तांबापुरा येथे सुमारे 110 कोटी कर्ज काढून अकरा हजार घरे बांधण्याच्या कामास सन 2001 मध्ये सुरुवात झाली, त्याचे काम सत्ताधाऱ्यांनी खानदेशी बिल्डरच्या मर्जीतील बिल्डरला दिले होते. त्याला एकूण तीस कोटी रुपये बिनव्याजी देण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण केले नाही, त्यानंतर काम पूर्ण करण्याची मुदत वारंवार वाढवली गेली.

काही दिवसानंतर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. ठेकेदाराला बिनव्याजी रक्कम वापरण्याची परवानगी मिळाल्याने पालिका कर्जबाजारी झाली. डॉ प्रवीण गेडाम हे पालिका आयुक्त असताना ही बाब लक्षात आली, त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात लढाई सुरू होती. अखेर 31 ऑगस्ट 2019ला जळगावचे माजी खासदार सुरेश दादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्या सह 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. यातील बहुतांश आरोपी नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असून त्यात माजी खासदार सुरेशदादा जैन यांचा देखील समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details