महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, समर्थकांकडून हॉस्पिटलची तोडफोड - मानवता क्युरी हॉस्पिटल मुंबई नाका

भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनामुळे उपचारा दरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. तर 'उपचारा दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, म्हणून रोशन यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा' अशी मागणी मृताच्या वडीलांनी केली आहे.

भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे
भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे

By

Published : Apr 27, 2021, 12:23 PM IST

Updated : Apr 27, 2021, 12:35 PM IST

नाशिक- भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे यांचा कोरोना संसर्गामुळे मानवता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. निधनानंतर संतप्त झालेल्या घाटे समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यामुळे या घटनेचा निषेध करत हॉस्पिटलकडून आजपासून कोरोना रुग्ण घेण्यास नकार देण्यात आला आहे.

डॉक्टरांनी केला घटनेचा निषेध

नाशिकच्या भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांचा भाऊ सामजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू रोशन घाटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना मुंबई नाका येथील मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर घाटे समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत, पार्किंग मध्ये असलेल्या गाड्याच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेची नोंद मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुठल्याच कोरोना रुग्णाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येणार नाही, असा पवित्रा हॉस्पिटलने घेतला आहे. तसेच शहरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला आहे.

'डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा'
'रोशन घाटे यांच्यावर योग्य उपचार झाले नाही. त्यांच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, म्हणून रोशन यांचा मृत्यू झाला. डॉ. राज नगरकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा', अशी मागणी रोशन यांचे वडील किशोर घाटे यांनी केला आहे.

हेही वाचा -'ईटीव्ही बालभारत' लॉंच, रोमांचक कार्टून शोज आता आपल्या मायबोलीत

Last Updated : Apr 27, 2021, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details