नाशिक:प्रेमसंबंधाला अडसर ( Obstacles to love affair ) ठरणाऱ्या डाॅक्टर पतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टरला भुलीचे इंजेक्शन ( anesthesia ) देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला 33 दिवसांपासून काेमात असलेल्या या डाॅक्टरचा अखेर गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला (Death during treatment) आहे. डाॅक्टरांच्या मुलाने तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा : या घटनेत नाेंदणी विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा गुन्हा केला. सतिष केशवराव देशमुख असे मृत डाॅक्टरचे नाव आहे. तर, सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर अशी डाॅक्टरांना मारनाऱ्या संशयितांची नावे आहेत. ते दाेघेही सध्या फरार आहेत. ही धक्कादायक घटना 10 सप्टेंबर राेजी म्हसरुळ येथील परिक्षित हाॅस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी म्हसरुळ पाेलिस ठाण्यात दाेघांविरुद्ध डाॅक्टरला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
दिवस कोमात राहिल्यानंतरमृत्यू : डाॅ. देशमुख यांनी सुहासिनीला तीच्या प्रेमसंबंधा बद्दल विचारणा केल्यामुळे तिघांत वाद झाले. यानंतर सुहासिनीने डॉक्टर पतीला रुग्णालयातील विश्रांती कक्षात भुलीचे इंजेक्शन दिले. 33 दिवस कोमात राहिल्यानंतर डॉक्टरांचा मृत्यू झाला दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठांशी चर्चा करुन दाखल गुन्ह्यात वाढीव कलमांन्वये तपास केला जाईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक आहिरे यांनी ईटिव्ही भारत ला बोलताना दिली.
डाॅक्टर जेल मधे जाताच दुसरे लग्न : डाॅक्टरांच्या मृत्यू नंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. आधी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता आता खुनाचा गुन्हा दाखल होउ शकतो. दरम्यान या घटने मागे एखाद्या हाॅरर चित्रपटाला शोभेल अशी कहानी असल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहिती नुसार डाॅ. देशमुख यांचे सुहासिनीसाेबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येेस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात डॉ. देशमुख काहीवर्षे कारागृहात शिक्षा भाेगत हाेते. देशमुख यांची दुसरी पत्नी सुहासिनीला एक अपत्यही आहे. मात्र, देशमुख कारागृहात असल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले.
तीसऱ्याशी सुत जमले आणि... : ज्याच्याशी विवाह केला, त्याचाही काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, डॉ. देशमुख हे कारागृहातून बाहेर आले. आणि आल्यावर पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलासह राहू लागले. यातच सुहासिनी यांना कोरोना झाला. आणि ती पुन्हा उपचारासाठी याच डाॅक्टरांकडे आली. तेथेच त्यांचे पुन्हा जुळले. आणि त्यांनी त्यांनी रजिस्टर पध्दतीने लग्न केले त्या दोघांत सगळे व्यवस्थित असताना सुहासिनी यांचे सुत तीसऱ्याशी जमले आणि त्यातुनच त्यांचे डाॅक्टरांशी खटके उडाले प्रेम संबंधांना डाॅक्टरांचा अडसर होत आहे हे पाहुन तीने नव्या प्रियकरासोबत कट रचत भुलीचे इंजेक्शन देत डाॅक्टरांचा काटा काढला. आणि नव्या प्रियकरासह ती आता फरार झाली आहे.