महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी - Suicide attempt of youth in Nashik

नाशिक शहरात एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शहरातील सिटी सेंटर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Suicide attempt of youth in Nashik
नाशिकमध्ये युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Mar 6, 2020, 7:54 AM IST

Updated : Mar 6, 2020, 8:52 AM IST

नाशिक - शहरातील सिटी सेंटर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल मगरे असे या युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गंगापूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

नाशिकमध्ये युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न...

हेही वाचा...विवस्त्र करून मारहाणीचा 'तो' व्हिडिओ बनावट; 'त्या' महिलेच्या पतीची कबुली

खरेदीसाठी मॉलमध्ये आलेल्या युवकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशकात घडली. त्याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, मॉल कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

जखमी युवकाच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून त्याचे नाव स्वप्निल मगरे (२५, रा. ओझर मिग) असे असल्याचे समजले. उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉलमध्ये ही घटना घडली. हा युवक सायंकाळच्या सुमारास मॉलमध्ये आला होता. आठच्या सुमारास त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याच्या हाताला आणि पायाला तसेच छातीला गंभीर दुखापत झाली. या युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Last Updated : Mar 6, 2020, 8:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details