नाशिक - शिक्षक पात्रता परीक्षा-2021 (MAHA TET 2021 today) रविवारी सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होत आहे. शहरातील द्वारका परिसरातील रवींद्र विद्यालय येथे टीईटी परीक्षेस वेळेत न आलेल्या मुलांना परीक्षा केंद्रात न घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
नाशिकमध्ये परीक्षा केंद्रावर उडला गोंधळ आम्हाला परीक्षा देऊ द्या -एसटी बस बंदचा विद्यार्थीना फटका बसला. बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थांना खासगी वाहतुकीने यावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना गेटच्या आत घेण्यात आले नाही. परीक्षार्थी विद्यार्थी रडत असून गेट बंद असल्याने पोलिसांना आत सोडा अशी विनवणी करत आहे. तर काही विद्यार्थ्यांनी वेळेत आलो तरी परीक्षा केंद्रात घेतले नाही, असा केला आरोप केला. आम्हाला परीक्षा देऊ द्या, अशी मागणी त्यांनी केली.टीईटी परीक्षेस वेळेत न आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तर परीक्षा केंद्राबाहेर काही विद्यार्थी अक्षरशा रडताना देखील दिसून आले. रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजेच टीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी हे बाहेरगावावरून आले. परंतु काही विद्यार्थी वेळेत पोहोचूनही त्यांना गेट बंद केल्याने प्रवेश मिळू शकला नाही. या विद्यार्थ्यांनी पोलिसांना विनवण्या केल्या. परंतु पोलिसांनी त्यांची कोणतीही गोष्ट मान्य केली नाही. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. या सर्व गोंधळ नाशिक शहरातील द्वारकाजवळ असलेल्या रवींद्र विद्यालयाच्या परिसरात बराच वेळ सुरू होता. परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी कोणताही लवाजमा ठेवला नाही त्यामुळे विद्यार्थ्यां याठिकाणी रडली देखील. परंतु पोलिसांनी मात्र या ठिकाणी प्रवेश दिला नाही.